सातारा – टोकाचे मतभेद विसरुन भाजपचे खासदार उदयनराजे आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर एकत्र आले आहेत. सातारच्या शासकीय विश्रामगृहामधील कक्ष क्रमांक 1 मध्ये दोन्ही नेत्यांची अचानक भेट झाली. यावेळी दोघांमध्ये दिलखुलास गप्पा रंगल्या होत्या. यावेळी दोघांनीही एकमेकांना कोरोनाबाबत काळजी घेण्यासही सांगितले. यावेळी राजकारणातील विविध मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. या दोन्ही राजेंमधील वाद चांगलाच वाढला होता आणि यामुळे अनेकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.परंतु दोन्ही राजेंमध्ये झालेल्या या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून राजकीय गोटात अनेक चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान या दोन्ही राजेंमधील राजकीय वैर हे सर्व परिचित आहे. एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी हे दोघं सोडत नाहीत. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान दोघांमध्ये अनेक महिन्यांपासून वाद निर्माण झाले होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी दोघांमधील वाद विकोपाला गेला होता. राष्ट्रवादीमध्ये असणारे उदयनराजे अचानक खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये गेले होते. त्यावेळी लोकसभेच्या पोटनिवडणुकीत रामराजे नाईक निंबाळकर यांनी उदयनराजेंवर टीका केली होती. परंतु आज दुपारी रामराजे शासकीय विश्रामगृहावर एका कक्षात बसलेले होते. त्याचवेळी उदयनराजे देखील आपल्या निकटवर्तीय कार्यकर्त्याला भेटण्यासाठी विश्रामगृहावर आले होते. रामराजे देखील विश्रामगृहावर असल्याची माहिती मिळाल्यानंतर ते थेट रामराजे यांना भेटायला गेले. या ठिकाणी दोघांनी दिलखुलास गप्पा देखील मारल्या. यावेळी उदयनराजेंच्या गालावर खळीदार हास्य फुलले होते.
कशी झाली भेट?
जिल्हा बँकेची सभा उरकून रामराजे शासकीय विश्रामगृहात आले होते. त्यावेळी शासकीय विश्रामगृहात थेट उदयनराजेंचं आगमन झाले. पोर्चमध्ये येताच त्यांनी कोण थांबलंय.असं विचारले. यावेळी रामराजे असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर उदयनराजे थेट रामराजे बसले होते त्या 1 नंबरच्या सूटमध्ये जाऊन पोहचले. रामराजेंसमोर उदयनराजे जाऊ उभे ठाकले. उदयनराजेंना पाहून रामराजेंनी या महाराज असे म्हणून राज घराण्याचा शिष्टाचार पाळला. त्यानंतर दोघांनीही बसून काही काळ गप्पा मारल्या.
ते मुख्यमंत्री होते त्यावेळी मी विरोधी पक्षात होते, देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याला उजाळा देणाय्रा साप्ताहिकाच्या प्रकाशनादरम्यान पाहा काय म्हणाल्या चित्रा वाघ?https://t.co/LlO97szS9P pic.twitter.com/BaimnlMmDZ
— Mahapolitics (@Mahapoliticsnew) October 31, 2020
COMMENTS