… तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार ?

… तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार ?

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या काल मातोश्रीवर भेट झाली. नियोजित वेळेपेक्षा दुप्पट वेळ म्हणज्येच तब्बल 2 तास ही बैठक सुरू होती. यामध्ये उद्धव ठाकरे आणि अमित शहा हे दोघेच बराच वेळ चर्चा करत होते. यावरुन आता उद्धव ठाकरे यांची नाराजी कमी करण्यात अमित शहा यांना यश आल्याचे अंदाज बांधले जात आहेत. एवढच नाही तर आगामी लोकसभा निवडणूक युतीमध्ये लढवण्यास शिवेसना सकारात्मक असल्याची माहितीही भाजपचे सूत्र देत आहेत.

मात्र भेटीला 12 तास उलटत नाहीत तोच संजय राऊत यांनी शिवसेनाचा स्वबळाचा निर्णय कायम असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. शिवेसनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीमध्ये स्वबळाचा निर्णय झाला आहे. त्यामुळे इतर पक्षातला नेता येऊन आमचा निर्णय बदलणार नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे भाजपला मात्र शिवसेना युतीमध्ये निवडणूक लढवेल अशी आशा आहे. मुख्यमंत्र्यांसह राज्यातले नेते असो किंवा अमित शहा यांना मात्र युती हवीच आहे.

शिवसेना पुन्हा पुन्हा युती नको, स्बळावरच निवडणुक लढवणार याचा पुनरुच्चार करत आहे. तरी भाजपला युती का हवी आहे ? भाजप  मोदींच्या जादुचा कितीही दावा करत असले तरी 2014 परिस्थिती सध्या राहिलेली नाही. चंद्रबाबू नायडू सोडून गेले आहेत. उत्तर प्रदेशात सपा, बसपा आणि काँग्रेस एकत्र आले तर भाजपचा पूर्ण सफाया होण्याची शक्यता आहे. गोरखपूर, फूलपूर, आणि कैराना या लोकसभा पोटनिवडणुकीतील निकाल भाजपचे काही खरे नाही असेच दर्शवत आहेत. एकट्या उत्तर प्रदेभात भाजपनं तब्बल 73 जागा जिंकल्या आहेत. जिथेच जर एवढा फटका बसत असेल तर सत्तेचा सोपन चढणे अवघड आहे याची जाणीव भाजपला झाली आहे.

तसंच मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, दिल्ली या आणि उत्तरेच्या काही राज्यात भाजपनं जवळपास सर्वचच्या सर्व जागा जिंकल्या होत्या. आता मात्र त्याच्यातल्या 50 टक्के जागा तरी कमी होण्याची शक्यता आहे. असं असेल तर भाजपला 200 चा टप्पा ओलांडणंही अवघड होऊन जाऊ शकतं. त्यामुळे महाराष्ट्रातही उत्तरेप्रमाणे फटका बसू याची खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या तब्बल 48 जागा आहेत. गेल्यावळी युतीमिळून त्यांना तब्बल 42 जागा मिळाल्या होत्या. तर एकट्या भाजपला 22 जागा मिळाल्या होत्या. शिवसेना वेगळी लढली तर निभाव लागणार नाही याची भाजपच्या चाणाक्यांना कल्पना आहे. त्यामुळेच शिवसेनेचा नकार असतानाही पुन्हा पुन्हा गोंजारण्याचे भाजपचे प्रय़त्न आहेत.

गेल्यावेळी केवळ विधानसभेच्या तीन चार जागांवरुन युती तुटली होती. यावेळी मात्र कोणतीही तडजोड करायला भाजपचे नेते तयार होण्याची शक्यता आहे. गेली तीन वर्ष आम्ही मोठे भाऊ म्हणणारे भाजप आता लहान भावाच्या भूमिकाही स्विकारतील अशी स्थिती आहे. त्यामुळे गेल्यावेळचे शिवसेनेचे मिशन 151 हेही भाजप मान्य करण्याची शक्यता आहे. एवढच नाही तर कोणाचाही जास्त निवडूण आल्या तरी उद्धव ठाकरेंना (शिवसेनेला) मुख्यमंत्रीपद देण्यासही भाजप तयार होईल अशी स्थिती आहे. कारण त्यांना एखादं राज्य गमावलं तर काही फरक पडणार नाही तर दिल्लीतील सत्ता त्यांना हवी आहे. एवढं करुनही शिवसेना युतीसाठी तयार होईल याची आज तरी गॅरंटी नाही.

COMMENTS