मुंबई – शिवसेनेच्या आजच्या बैठकीत भाजपच्या मंत्र्यांच्या घोटाळ्यांची पुस्तीका पदाधिका-यांना वाटल्यानंतर शिवसेनेनं आरपारची तयारी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असताना, शिवेसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणुका कधीही होऊ शकतात, शिवसैनिकांनो तयार रहा असे ट्विट केले आहे. आजच्या शिवसेनेच्या बैठकीतील घोटाळ्याच्या पुस्तिकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्या कोअर कमिटीची बैठक बोलवली आहे. त्यातच उद्धव ठाकरेंनी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास निवडणुकीबाबत ट्विट केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
COMMENTS