मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 24 नोव्हेंबररोजी अयोध्येच्या दौ-यावर जाणार आहेत. 24 नोव्हेंबररोजी ते सायंकाळी शरयू नदीची महाआरती करणार आहेत. त्यानंतर दुस-या दिवशी म्हणजेच 25 नोव्हेंबररोजी सकाळी रामजन्मभूमी जागेला भेट आणि दर्शन घेणार आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरे हे साधु-संताशी राम मंदिर उभारणीबाबत चर्चा आणि आशीर्वाद घेणार आहेत. त्यानंतर याचठिकाणी उद्धव ठाकरेंची जाहीर सभा पार पडणार आहे. ही सभा पार पडल्यानंतर शक्य झाल्यास उद्धव ठाकरे हे पत्रकार परिषद घेतील अशी माहिती शिवसेनेनं दिली आहे.
दरम्यान शिवसेनेच्या पारंपरिक दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंदिरनिर्माणाचा नारा दिला होता. त्यानं देशभरातील राजकारण ढवळून निघाले आहे. शिवसेनेच्या या घोषणेचे राष्ट्रीय राजकारणातही पडसाद उमटत असल्याचं दिसत आहे. हिंदुत्वासाठी काम करणाऱया संघटनांमध्येही उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱयाबाबत उत्सुकता आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या या दौ-याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
COMMENTS