उद्धव ठाकरे उद्यापासून विधानसभा निवडणूक प्रचारासाठी राज्याच्या दाैऱ्यावर !

उद्धव ठाकरे उद्यापासून विधानसभा निवडणूक प्रचारासाठी राज्याच्या दाैऱ्यावर !

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्यापासून विधानसभा निवडणूक प्रचारासाठी राज्याच्या दाैऱ्यावर जाणार आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये ठाकरे यांची पहिली सभा पार पडणार आहे. तसेच आजच्या दसरा मेळाव्यातून ते प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहेत. अहमदनगरनंतर मराठवाडा, विदर्भातही त्यांची प्रचारसभा हाेणार आहे. त्याचबरोबर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचाही राज्यात वेगळा प्रचार दाैरा असणार आहे.

दरम्यान महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील राज्यात प्रचारसभा घेणार आहेत. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजपाच्या या दोन स्टार प्रचारकांपैकी मोदींच्या ९ तर अमित शाहांच्या १८ सभा राज्यात होणार आहेत. यापैकी पंतप्रधानांची पहिली सभा १३ तारखेला जळगाव आणि विदर्भातील साकोली येथे होणार आहे. तर १६ तारखेला अकोला, पंढरपूर आणि पनवेलमध्ये होणार आहे. तसेच १७ तारखेला परळी, सातारा, पुणे आणि १८ तारखेला मुंबईत मोदींची सभा पार पडणार आहे.


त्यामुळे महायुतीतील नेत्यांनी राज्यात पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी कंबर कसली असल्याचं दिसत आहे.

COMMENTS