“मी कासव होईल परंतु धरणात लघूशंका करणारा अजित पवार होणार नाही !”

“मी कासव होईल परंतु धरणात लघूशंका करणारा अजित पवार होणार नाही !”

औरंगाबाद – मी शेळी, गांडूळ आणि कासव व्हायला तयार आहे, परंतु धरणात लघूशंका करणारा अजित पवार व्हायला तयार नाही अशी विखारी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तसेच राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेवरही उद्धव यांनी टीका केली असून अगोदर डल्ला मारला आणि आता हल्लाबोल करत आहेत. डल्ला मारणा-यांनी हल्लाबोल करु नये अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.  रविवारी उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्याचा  एकदिवशीय  दौरा केला असून  त्यावेळी ते बोलत होते.

दरम्यान संभाजीनगर येथील शेतकरी मेळाव्यातील कार्यक्रमात बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे. धरणात पाणी नाही मग मी काय त्याठिकाणी लघूशंका करु का असं वादग्रस्त वक्तव्य काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी केलं होतं. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यावरुन उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली असून मी शेळी, कासव, गांडूळ व्हायला तयार आहे परंतु लघूशंका करणारा अजित पवार होणार नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS