शिवसेना-भाजपमध्ये वादाची ठिणगी, मुख्यमंत्रीपदाबाबत उद्धव ठाकरेंचं वादग्रस्त वक्तव्य!

शिवसेना-भाजपमध्ये वादाची ठिणगी, मुख्यमंत्रीपदाबाबत उद्धव ठाकरेंचं वादग्रस्त वक्तव्य!

नाशिक – मुख्यमंत्रीदावरुन शिवसेना-भाजपमध्ये वादाची ठिणगी पडली असल्याचं दिसत आहे. कारण भाजपनं मुख्यमंत्रीपदावर दावा केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. बऱ्याच वर्षांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दुसऱ्या पक्षाचा नेता आपल्या व्यासपीठावर आले होते.आमचं ठरलेलं आहे, मुख्यमंत्री कोण असेल ?, अमित शाह आणि माझं बोलणं झालं आहे, त्यामुळे इतर कोणी यामध्ये नाक खुपसण्याची गरज नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते नाशिकमधील नांदगाव येथे बोलत होते.

दरम्यान भाजपची आज महत्त्वाची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकी भाजपचा मुख्यमंत्री होणार असल्याचं वक्तव्य भाजप नेत्यांनी केलं. तसेच या बैठकीनंतर भाजप नेते गिरीश महाजन यांनी शिवसेनेबाबत खळबळजनक दावा केला . शिवसेनेच्या जागा निवडून येण्यासाठी आम्हीच प्रयत्न केला. तसेच लोकसभेचा निकाल पाहता राज्यात भाजप मोठा भाऊ आहे. जिथे शिवसेना कमकुवत होती त्या ठिकाणी आम्ही मदत केली तसेच सर्वांची भावना भाजपचा मुख्यमंत्री व्हावा अशी असल्याचंही गिरीश महाजन यांनी म्हटलं.

त्यानंतर आमचं ठरलेलं आहे, मुख्यमंत्री कोण असेल ?, अमित शाह आणि माझं बोलणं झालं आहे, त्यामुळे इतर कोणी यामध्ये नाक खुपसण्याची गरज नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावरुन शिवसेना-भाजपमध्ये जुंपली असल्याचं दिसत आहे.

COMMENTS