मुंबई – गारपीटग्रस्त शेतकर्यांच्या प्रश्नावर शिवसेना आक्रमक झाली असून गारपीटग्रस्त शेतकर्यांना मदत मि़ळत नसेल तर ठिय्या आंदोलन करण्याचे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तालुका प्रमुखांना दिले आहेत. गारपीटग्रस्त शेतक-यांसाठी तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करा असं उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना म्हटलं आहे.
दरम्यान राज्यातील मराठवाडा आणि विदर्भात मोठ्याप्रमाणात गारपीट झाली आहे. या गारपीटीमुळे शेतक-यांचं मोठं नुकसान झालं. या शेतक-यांना नुकसानभरपाई देण्याची घोषणा राज्य सरकारनं केली आहे. परंतु योग्य ती भरपाई न मिळाल्यास शिवसेना शांत बसणार नसून या शेतक-यांना मदत मिळाली नाही तर ठिय्या आंदोलन करा असा आदेशच मातोश्रीवरुन उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या तालुका प्रमुखांना दिला आहे. त्यामुळे गारपीटग्रस्त शेतक-यांच्या मदतीवरुन आता शिवसेना सरकारला धारेवर धरणार असल्याचं दिसून येत आहे.
COMMENTS