मुंबई – पारनेरमधील शिवसेनेच्या नगरसेवकांना राष्ट्रवादीत घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचं दिसत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ‘आमचे नगरसेवक परत पाठवा, असा संदेश पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यामार्फत अजित पवार यांना संपर्क साधत निरोप कळवला असल्याची माहिती आहे.
पारनेर तालुक्यातील शिवसेनेचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेण्याची रणनीती चुकीची आहे. सत्तेतील मित्रपक्ष एकमेकांचे लोकप्रतिनिधी फोडायला लागले, तर योग्य संदेश जाणार नाही. त्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक परत शिवसेनेत पाठवावेत, असा निरोप उद्धव ठाकरेंनी अजित पवार कळवला असल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे यांच्या या थेट निरोपानंतर अजित पवार यांनी यावर विचार करण्याचं आश्वासन दिलं असल्याची माहिती आहे.
दरम्यान यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पारनेरमधील नगरसेवकांचा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम हा ठरवून झाला आहे. वरिष्ठ पातळीवरील नेत्यांशी याबाबत बोलणे झाले होते. ते नगरसेवक स्थानिक राजकारणाला कंटाळून राष्ट्रवादीत आले आहेत. आमच्या पक्षात आले नसते तर ते दुसऱ्या (भाजप) पक्षात गेले असते. असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
COMMENTS