मुंबई – शिवसेना प्रमुख बाळासाहेबांना, 2000 साली अटक करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी तुमची आपुलकी कुठे गेली होती असा सवाल उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांना केला आहे. बुधवारी घेण्यात आलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी बाळासाहेबांबद्दलच्या अनेक आठवणी सांगितल्या. आज तुम्हाला त्यांची आपुलकी वाटत आहे परंतु 2000 साली म्हणजे बाळासाहेबांच्या वयाच्या 70 व्या वर्षी अटक करण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी शरद पवारांची बाळासाहेबांबद्दलची आपुलकी कुठे गेली होती? असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. शिवसेना प्रवक्त्या आणि आमदार निलम गोऱ्हे यांच्या ‘शिवसेनेतील माझी 20 वर्षे’ या पुस्तकाचं प्रकाशन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते.
दरम्यान आर्थिक निकषानुसार आरक्षण ही बाळासाहेबांची भूमिका स्वीकारली असती, तर जातीपातीच्या भिंती उभ्याच राहिल्या नसत्या, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच बाळासाहेबांची भूमिका न स्वीकारता जातीपातीच्या आधारावर राजकारण करण्यात आलं, शिवसेना फोडण्याचाही अनेकवेळा प्रयत्न करण्यात आला असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
COMMENTS