युपीत काँग्रेसला धक्का, प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा !

युपीत काँग्रेसला धक्का, प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा !

लखनौ – उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला धक्का बसला असून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. फुलपूर आणि गोरखपूर लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसची कामगिरी निराशाजनक झाल्यामुळे या पराभवाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राजीनामा दिला असल्याचं बोललं जात आहे. राज बब्बर यांनी मंगळवारी ट्वीट केलं होतं. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी  “”अंत में मित्रों, इतना ही कहूंगा कि अंत महज एक मुहावरा है जिसे शब्द हमेशा अपने विस्फोट से उड़ा देते हैं.” म्हटलं होतं.

उत्तर प्रदेशात घेण्यात आलेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत सपा आणि बसपाचा विजय झाला आहे. काँग्रेसला यावरच समाधान मानवं लागलं असल्यामुळे राज बब्बर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिली आहे. मंगळवारी कवी केदारनाथ सिंह यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एक ट्वीट केले आणि त्यातूनही आपल्या राजीनाम्याचे संकेत दिले होते. लोकसभा निवडणुकीला नजरेसमोर ठेवून उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून ‘ब्राम्हण चेहरा’ देण्याची शक्यता असून जतिन प्रसाद, राजेश मिश्रा किंवा लातेशपती त्रिपाठी यांच्या नावांची चर्चा असल्याची माहिती आहे.

 

COMMENTS