लखनऊ – 2014 त्यानंतर याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजयाची पुनरावृत सत्ताधारी भाजपनं स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत केली आहे. महापौरपदाच्या निवडणुक झालेल्या 16 जागांपैकी तब्बल 14 जागांवर भाजपचा झेंडा फडकला आहे. तर 2 ठिकाणी बसपाला यश मिळालं नाही.
या निवडणुकीत समाजवादी पार्टीलाही जोरदार फटका बसला आहे. त्यांना महापौरपदाची एकही जागा जिंकता आली नाही. तसाच फटका काँग्रेसला बसला आहे. गांधी घराण्याचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणा-या अमेठीमध्येही काँग्रेसचा धक्कादायक पराभव झाला आहे. बसपानं अलीगढ आणि मेरठ अशा दोन ठिकाणी विजय मिळवाला आहे.
उत्तर प्रदेशातील चारही प्रतिष्ठेच्या जागांवर भाजपाचा झेंडा फडकला आहे. राजधानी लखनऊमध्ये भाजपच्या संयुक्ता भाटिया या पहिल्या महापौर झाल्या आहेत. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभा क्षेत्रातील वारणसी, आयोध्या आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं होमपिच असलेल्या गोरखपूरमध्ये भाजपनं यश संपादन केलं आहे. कानपूर आणि गाझीयाबादमध्येही भाजपला चांगलं यश मिळालं आहे.
COMMENTS