यूपीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये खरंच भाजपला मोठं यश मिळालंय ? आकडेवारी वाचा आणि तुम्हीच ठरवा !

यूपीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये खरंच भाजपला मोठं यश मिळालंय ? आकडेवारी वाचा आणि तुम्हीच ठरवा !

लखनऊ –  उत्तर प्रदेशामध्ये भाजप स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकील विजयाचा आनंदोत्सव साजरा करत आहे. मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत आणि या निवडणुकीतल आकडेवारी पाहिल्यानंतर भाजपला तेवढं यश मिळालं नाही असचं म्हणावं लागेल. आकडेवारी तरी तशीच सांगते. या निवडणुकीत सर्वच पक्ष स्वबळावर लढले होते.

राज्यात 16 महानगरपालिकांपैकी 14 महानगरपालिकांमध्ये यश मिळालं आहे. हे जरी खरं असलं तरी 2012 मध्ये सपाची एवढी लाट असताना आणि भाजप अत्यंत खराब स्थिती असतानाही भाजपने तेंव्हा 16 पैकी 10 ठिकाणी महापौरपद मिळवले होते. त्या तुलनेत भाजपने 4 अधिकच्या ठिकाणी महापौरपद मिळवले आहे. त्यामुळे महानगरामधील मतदार हा नेहमी भाजपचा पाठिराखा राहिलेलं दिसून येत आहे.

आता नगरपालिका निवडणुकीची आकडेवारी पाहू… राज्यात एकूण 198 नगपालिकेची निवडणूक झाली. त्यापैकी 70 ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष झाले आहेत. तर समाजवादी पार्टीचे 45 ठिकाणी नगराध्यक्ष झाले आहेत. बसपाचे 29, काँग्रेसचे 9, अपक्ष आणि अन्यचे 45 नगराध्यक्ष झाले आहेत.

उत्तर प्रदेशात 438 नगरपंचायतीची निवडणुक झाली. इथेही भाजपाला फारसे यश मिळालेले नाही. 438 पैकी फक्त 100 ठिकणी भाजपचे अध्यक्ष झाले आहेत. तर सपाचे 83, बसपाचे 45, काँग्रेसचे 17 अध्यक्ष झाले आहेत. तर तब्बल 182 ठिकाणी अपक्षांचा झेंडा फडकला आहे. तर 11 ठिकाणी इतर पक्षांचे अध्यक्ष झाले आहेत.

तीनही प्रकारच्या निवडणुकीत भाजप नंबर 1 चा पक्ष राहिला आहे. मात्र 2014 ची किंवा यावर्षी झालेली विधानसभेच्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपाला तेवढे यश मिळाले नाही हे मात्र नक्की. भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी हा विजय नक्कीच मनोधर्य वाढवणारा आहे. मात्र एकत्र आलो तर भाजपला पराभूत करु शकतो असा  संदेश विरोधकांना या विजयातून मिळाला आहे.  दैनिक भास्कर या वर्तमान पत्राने ही बातमी दिली आहे. त्याची लिंक खाली दिली आहे.

https://www.bhaskar.com/uttar-pradesh/lucknow/news/UP-LUCK-up-nagar-nigam-chunav-results-5759061-PHO.html?ref=ht

COMMENTS