अधिवेशन रद्द केल्याने या नेत्यांनी साधला निशाना

अधिवेशन रद्द केल्याने या नेत्यांनी साधला निशाना

मुंबईः राज्याचे विधीमंडळाचे अधिवेशन दोन दिवसांचे घेतल्याने भाजपकडून टिका केली जात होती. दरम्यान केंद्र सरकारने संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द केल्यानंतर मोदी सरकारवर सर्व पक्षांनी टीकास्त्र सोडलं आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर टिका करीत ‘भाजपची केंद्रात एक तर राज्यात दुसरी अशी नेहमीच सोयीची व दुटप्पी भूमिका राहिलीय,’ असा टोलाच पवार यांनी लगावला आहे. तर शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनीही याच मुद्द्यांवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संसदेचं हिवाळी आधिवेशन रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर विरोधकांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उडवली आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनीही एक ट्विट केलं आहे. उर्मिला मातोंडकर यांचं हे ट्विट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

‘भाजपची केंद्रात एक तर राज्यात दुसरी अशी नेहमीच सोयीची आणि दुटप्पी भूमिका राहिलीय. राज्यात दोन दिवसांचं अधिवेशन घेणारं महाविकास आघाडी सरकार हे आठवं आश्चर्य आहे,अशी टीका भाजपचे नेते करतात,पण केंद्राने तर हिवाळी अधिवेशनच रद्द करण्याचा निर्णय घेतला. मग हे कितवं आश्चर्य आहे?, असा बोचरा सवाल पवार यांनी केला आहे.

 

‘राज्यात निवडणुका घेण्यात आल्या, त्यासाठी मोठ्या सभांचेही आयोजन करण्यात आलं. सर्व पक्षांच्या चर्चेशिवाय जिथे कायदे लादले जातात ती संसद वगळता संपूर्ण देश पुन्हा पुर्ववत झालाय. खरोखरच खूप लोकशाही आहे,’ असं ट्विट उर्मिला मातोंडकर यांनी केलं आहे.

 

COMMENTS