बालनाट्यचळवळीच्या अध्वर्यू हरपल्या – मुख्यमंत्री

बालनाट्यचळवळीच्या अध्वर्यू हरपल्या – मुख्यमंत्री

मुंबई –  ज्येष्ठ नाट्यनिर्मात्या सुधा करमरकर यांचं वयाच्या 85 व्या वर्षी ह्रदय विकाराच्या झटक्याने  निधन झालं आहे. त्यांच्या जाण्यामुळे बालनाट्यचळवळीच्या अध्वर्यू हरपल्या असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. बालरंगभूमीच्या विकासासाठी समर्पित भावनेने आयुष्य वेचलेल्या ज्येष्ठ नाट्यनिर्मात्या सुधा करमरकर यांच्या निधनाने सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हाणी झाली असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

तसेच कुटुंबातूनच नाट्यसेवेचा वारसा घेऊन आलेल्या सुधाताई या क्षेत्राशी पूर्णतः समरस झाल्या होत्या. मराठी रंगभूमीने प्रारंभीच्या वाटचालीत दुर्लक्षित केलेल्या बालकांसाठीच्या स्वतंत्र रंगभूमीचा त्यांनी प्राधान्याने विचार केला. अमेरिकेत जाऊन त्यांनी बालरंगभूमी संकल्पनेचा विशेष अभ्यास केला होता. बालनाट्य चळवळ रुजविण्यासाठी लिटिल थिएटर या संस्थेची स्थापना करून त्या माध्यमातून निष्ठेने प्रयत्न केले. या चळवळीच्या त्या खऱ्या अर्थाने अध्वर्यू होत्या. नाट्यलेखन, दिग्दर्शन, निर्मिती, अभिनय अशा सर्वच भूमिका पार पाडताना त्या जणू आयुष्यभर रंगभूमीशी अविभाज्यपणे जोडल्या गेल्या होत्या. दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांमध्ये सुद्धा त्यांनी अभिनय केला असून अनेक कलावंतही घडवले आहेत.

सुधा करमकर यांची गाजलेली नाटकं आणि भूमिका

दुर्गाकाकू- भाऊबंदकी?
दुर्गी- दुर्गी
धनवंती- बेईमान
बाईसाहेब- बाईसाहेब
मधुराणी- आनंद
मामी- माझा खेळ मांडू दे
यशोधरा- मला काही सांगायचंय
येसूबाई- रायगडाला जेव्हा जाग येते

अनुराधा- विकत घेतला न्याय
उमा- थँक यू मिस्टर ग्लॅड
ऊर्मिला- पुत्रकामेष्टी
कुंती- तो राजहंस एक
गीता- तुझे आहे तुजपाशी

दादी- पहेला प्यार-हिंदी दूरदर्शनमालिका
रंभा- रंभा
राणी लक्ष्मीबाई- वीज म्हणाली धरतीला
सुमित्रा- अश्रूंची झाली फुले
चेटकीण- बालनाट्य-मधुमंजिरी
जाई- कालचक्र

COMMENTS