औरंगाबाद – उस्मानाबाद-बीड-लातूर स्थानिक स्वराज्यसंस्था मतदारसंघाची मतमोजणी तातडीनं करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिले आहेत. त्यामुळे या मतदारसंघाच्या मतमोजणीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे या मतदारसंघातील मतमोजणी आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळी सुरू होण्याची शक्यता आहे.
बीड नगरपालिकेतील काकू नाना विकास आघाडीच्या अपात्र नगरसेवकांची मते स्वतंत्रपणे मोजण्याला काकू नाना विकास आघाडीनं हरकत घेतली होती. ती मान्य करत सर्व मते एकत्रित मोजण्याचे आदेश हायकोर्टानं दिले आहेत. या मतदारसंघात भाजपचे सुरेश धस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांच्यात थेट लढत आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे या निवडणुकीकडं मुंडे विरुद्ध मुंडे असंच पाहिलं जातंय. त्यामुळे कोणते मुंडे यामध्ये बाजी मारतात हे आज संध्याकाळ किंवा उद्या सकाळी निश्चित होईल.
COMMENTS