ब्रेकिंग न्यूज – विधान परिषदेसाठी भाजपचा उमेदवार जाहीर !

ब्रेकिंग न्यूज – विधान परिषदेसाठी भाजपचा उमेदवार जाहीर !

मुंबई – नारायण राणेंच्या जागेमुळे रिक्त झालेल्या जागेसाठी अखेर भाजपनं स्वपक्षाचा उमेदवार दिला आहे. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनाही भाजपचे उमेदवार प्रसाद लाड यांना पाठिंबा देणार आहे. शिवसेनेला मान्य होईल असाच उमेदवार भाजपनं देण्याचं शिवसेनेला आश्वासन दिलं होतं. त्यानुसार प्रसाद लाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सकाळी 11 वाजता प्रसाद लाड उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

काँग्रेसकडूनही सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने यांची उमेदवारी निश्चित समजली जात आहे. तेही आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. शिवसेनेनं भाजपला पाठिंबा दिल्यास प्रसाद लाड यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

COMMENTS