विजय रुपाणींनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ, शपथविधी सोहळ्याला दिग्गज नेत्यांची उपस्थिती !

विजय रुपाणींनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ, शपथविधी सोहळ्याला दिग्गज नेत्यांची उपस्थिती !

अहमदाबाद – गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्याला सुरुवात झाली आहे. विजय रुपाणी हे दुस-यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. तर उपमुख्यमंत्रीपदाची माळ नितीन पटेल यांच्या गळ्यात पडली आहे. या सोहळ्याला भाजपच्या दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. या मंत्रिमंडळात पाटीदार समाजाच्या 6 नेत्यांना स्थान दिलं गेल्याची माहिती आहे. गुजरातमध्ये भाजपकडून सहाव्यांदा सत्ता स्थापन केली आहे.

विजय रुपाणी यांच्या शपथविधी  सोहळ्यात राज्य मंत्रिमंडळातील १९ सदस्यांनीही शपथ घेतली आहे. कॅबिनेट मंत्रीपदी  नितीन पटेल, आर सी फालदू, भूपेंद्र चुडासमा, कौशिक पटेल, सौरभ पटेल, गणपत वसावा, जयेश रादड़िया, दिलीप ठाकोर, ईश्वर परमार तर राज्यमंत्रीपदी प्रदीप सिंह जडेजा, परबत पटेल, पुरुषोत्तम सोलंकी, बचूभाई खाबड़, जयद्रथ परमार, ईश्वरसिंह पटेल, वासन अहिर, वैभवरी दवे, रमनलाल पाटकर, कुमार कनानी यांनी शपथ घेतली.

सचिवालय मैदानात हा शपथविधी सोहळा पार पडला असून या शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यासह भाजप आणि एनडीएशासित 18 राज्यांचे मुख्यमंत्री देखील उपस्थित होते. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अरूण जेटली, नितीन गडकरी, जे.पी.नड्डा, अनंत कुमार समवेत अनेक नेत्यांनी भाग घेतला. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, यूपीचे योगी आदित्यनाथ, छत्तीसगडचे रमन सिंह, राजस्थानच्या वसुंधरा राजे व भाजपशासित इतर राज्यातील मुख्यमंत्री सामील झाले होते. त्याचबरोबर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल, आनंदीबेन पटेल आणि शंकरसिंह वाघेला हेही उपस्थित होते. एका शपथविधी सोहळ्याला एवढ्या मोठ्या संख्येने मुख्यमंत्री उपस्थित राहण्याची ही पहिलीच वेळ आहे.

https://twitter.com/ANI/status/945536949619589120

http://www.mahapolitics.com/vijay-rupani-swearing-ceremony/

 https://twitter.com/ANI/status/945540739655548928

https://twitter.com/ANI/status/945539623488405504

https://twitter.com/ANI/status/945538447619514368

COMMENTS