अभिनेता रजनीकांतची राजकीय थर्टी फर्स्ट, नव्या वर्षापासून नव्या भूमिकेत !

अभिनेता रजनीकांतची राजकीय थर्टी फर्स्ट, नव्या वर्षापासून नव्या भूमिकेत !

चेन्नई – गेल्या काही दिवसांपासून दक्षिणेतील सुपरस्टार रजनिकांत यांच्या राजकारणातील प्रवेशाबाबत चर्चा सुरु होती. काही दिवसांपूर्वी कमल हसन यांनी राजकीय एन्ट्री केल्यानंतर  रजनीकांत राजकारणात कधी येणार, याची उत्सुकता चाहत्यांना लागली होती. रजनिकांतला आता राजकीय प्रवेशचा मुहूर्त सापडला असून  ३१ डिसेंबरला राजकारणात प्रवेश करणार असल्याचे रजनीकांत यांनी जाहीर केल आहे. त्यामुळे रजनिकांतची यावर्षीची थर्टीफर्स्ट ही राजकीय थर्टीफर्स्ट असून ३१ डिसेंबरपासून रजनिकांत वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.

रजनिकांतनं राजकारणातील प्रवेशाबात चेन्नईमध्ये जाहीर घोषणा केली आहे. रजनिकांत स्वतःचा राजकीय पक्ष काढतील असंही बोलंलं जात आहे. विशेषतः जयललिता यांच्या मृत्यूनंतर राज्याच्या राजकारणात पोकळी निर्माण झाली आहे. ती भरुन काढण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचं बोलंलं जात आहे. काही दिवसांपापूर्वी त्यांनी तामिळनाडू राज्याचा दौरा केला होता. तब्बल 9 वर्षानंतर ते आपल्या चाहत्यांना भेटले होते. राज्यभर दौरा केल्यामुळे आणि राजकारणात आलो तर चांगल्या लोकांनाच फक्त सोबत ठेवीन असं वक्तव्य केल्यामुळं रजनिकातं हे राजकारणात पदार्पण करणार अशा चर्चांना उत आला होता. त्यातच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यामुळे ते भाजपमध्ये जाणार अशाही चर्चा सुरू झाल्या होत्या. हे कमी की काय म्हणून भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी रजनिकांत भाजपमध्ये येत असतील तर त्यांचं स्वागतचं आहे असं वक्तव्य केलं होतं.

दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार  रजनिकांत हे स्वतःचा पक्ष काढणार असून  त्यांच्या पक्षाच्या नावाची  घोषणा ३१ डिसेंबरलाच केली जाणार आहे.राजकारणामध्ये येण्यास थोडा उशीरच झाला आहे परंतु माझा राजकीय प्रवेशच मोठा विजय आहे. राजकारण हे क्षेत्र माझ्यासाठी नवे नाही त्यामुळे राजकाणातही आपण आग्रेसर राहू असा विश्वास रजनिकांत यांनी व्यक्त केला आहे.

COMMENTS