बारामतीच्या टग्याचे सगळे नट बोल्ट ढिल्ले करणार, शिवतारेंचं अजित पवारांना प्रत्युत्तर!

बारामतीच्या टग्याचे सगळे नट बोल्ट ढिल्ले करणार, शिवतारेंचं अजित पवारांना प्रत्युत्तर!

पुणे – जलसंपदामंत्री विजय शिवतारेंनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना प्रत्युत्तर दिलं आहे. मी इंजिनिअर असून मला नट बोल्ट आवळता येतात आणि ढिल्ले करता येतात, त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत बारामतीच्या या टग्याचे सगळे नट बोल्ट ढिल्ले करणार असल्याचं विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे. शिवाजी आढळराव यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.

दरम्यान अजित पवार यांनी आपल्या गावरान शैलीत यंदा शिवतारे कसा आमदार होतो, तेच बघतो… सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे अजित पवारने एकदा ठरवलं की ठरवलं, असं बारामतीच्या सुप्रिया सुळे यांच्या सांगता सभेत बोलले होते. त्यानंतर शिवतारेंनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे. मी इंजिनिअर असून मला नट बोल्ट आवळता येतात आणि ढिल्ले करता येतात, त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत बारामतीच्या या टग्याचे सगळे नट बोल्ट ढिल्ले करणार असल्याचं विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS