मुंबई क्रिस्टल आग प्रकरण, दोषी अधिका-यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा – विखे-पाटील

मुंबई क्रिस्टल आग प्रकरण, दोषी अधिका-यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा – विखे-पाटील

मुंबई –  परळ येथील क्रिस्टल टॉवरमध्ये आज सकाळी आग लागल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती असून अनेक जण जखमी झाले आहेत. अगीचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून या  आगप्रकरणी पालिका आयुक्तांचे निलंबन तर बिल्डर व दोषी अधिकाऱ्यांविरूद्ध सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे.  तसेच मुंबईतील बहुमजली इमारतींचे परवाने व सुरक्षा व्यवस्थेचे आंतरराष्ट्रीय मानांकित संस्थांकडून अंकेक्षण करण्याची मागणी आज पत्राद्वारे विखे-पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

COMMENTS