मुंबई – हे सरकार गाढवावर आहेत तर यांचे प्रशासन घोड्यावर असल्याची जोरदार टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे. राज्यातील शेतक-यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कापूस उत्पादक शेतकरी बोंडअळीमुळे त्रस्त झाला आहे. तर या शेतक-यांची थट्टा उडवली जात असल्याचं विखे पाटील यांनी म्हटलं आहे. बुधवारी औरंगाबादमधील वैजापूरमध्ये अधिका-यांनी चक्क घोड्यावर बसून कापसाची पाहणी केली आहे.यावरुन विखे-पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे.
दरम्यान विखे पाटील यांनी हे सरकार गाढवावर तर यांचे प्रशासन घोड्यावर स्वार आहे. त्यामुळे त्यांना नागरिकांच्या समस्यांच्या मुळाशी जाता आलेलं नाही. या सरकारला जमिनीवर आणणं, हाच एकमेव इलाज आता शिल्लक असल्याचं म्हटलं आहे.
हे सरकार गाढवावर तर यांचे प्रशासन घोड्यावर स्वार आहे. त्यामुळे त्यांना नागरिकांच्या समस्यांच्या मुळाशी जाता आलेलं नाही. या सरकारला जमिनीवर आणणं, हाच एकमेव इलाज आता शिल्लक आहे.@INCMaharashtra pic.twitter.com/OCEJ0FQbpU
— R Vikhe Patil (@RVikhePatil) December 28, 2017
COMMENTS