मेघालयात  मुख्यमंत्रीपदासाठी दोन संगमांमध्ये घमासान, कोण मारणार बाजी ?

मेघालयात मुख्यमंत्रीपदासाठी दोन संगमांमध्ये घमासान, कोण मारणार बाजी ?

मेघालय – ईशान्य भारतातील त्रिपुरा, नागालँड आणि मेघालयातील विधानसभा निवडणुकांचे निकाल शनिवारी लागले आहेत. त्रिपुरा आणि नागालँडमध्ये भाजपच्या हाती सत्ता आली आहे. तर मेघालयात मात्र काँग्रेस आणि एनपीपीला चांगल्या जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे याठिकाणी आता सत्ता कोण स्थापन करणार आणि या दोन पक्षापैकी कोणत्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार याबाबात राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढविले जात आहेत.  तसेच सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेसने हालचाली वाढवल्या असून अपक्ष उमेदवारांशी बोलणी करण्यासाठी अहमद पटेल, मुकूल वासनिक आणि कमलनाथ यांना मेघालयात पाठवण्यात आले होते. त्यामुळे अपक्ष उमेदवारांना सोबत घेऊन काँग्रेस सत्ता स्थापन करणार का असा प्रश्न सध्या पडतोय.

मेघालयात कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या

काँग्रेस -२१

एनपीपी – १९

भाजप- ०२

इतर – १७

दरम्यान दुस-या बाजुला मेघालयात काँग्रेसनंतर एनपीपीला जास्त म्हणजेच 19 जागा मिळाल्या आहेत. सर्वात जास्त जागा मिळवणारे हे दोन पक्ष असल्यामुळे मुख्यमंत्रीपदावर आपला उमेदवार बसवण्यासाठी या दोन्ही पक्षाकडून राजकीय खेळी सुरु झाली आहे. काँग्रेसकडून मुकुल संगमा हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत तर एनपीपीकडून पीए संगमा हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी या दोन्ही संगमांमध्ये आता घमासान सुरु झालं असून यामध्ये कोणते संगमा बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

 

COMMENTS