हिमाचल प्रदेश – हिमाचल प्रदेशात काँग्रेसच्या हातातून सत्ता हिसकावून घेण्यात भाजपला यश आलं आहे. 44 जागा जिंकून भाजपनं एकहाती सत्ता मिळवली आहे. त्यामुळे आता भाजपचा मुख्यमंत्री कोण होणार याबाबत चर्चा सुरु आहे. भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार प्रेमकुमार धुमल यांचा पराभव झाल्यामुळे गड आला पण सिंह गेला अशीच काहिशी अवस्था भाजपची झाली आहे. प्रेमकुमार धुमल यांच्या पराभवामुळे भाजपचे केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा हे मुख्यमंत्री होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर चार वेळा आमदार राहिलेले जयराम ठाकूर यांच्याही नावाची चर्चा आहे.
हिमाचलमध्ये ९ डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत ६८ जागांसाठी ७४ टक्के मतदान झाले होते. हिमाचलमध्ये २०१२ साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने ३६ जागा जिंकून सत्ता स्थापन केली होती. मात्र यंदा सत्ताधारी काँग्रेसला खाली खेचत भाजपने हिमाचलची सत्ता काबिज केली आहे. या निवडणुकीत काँग्रेसला केवळ 21 जागांवरच समाधान मानावं लागलं आहे.
COMMENTS