मुंबई महापालिकेच्या त्रिभाजनावरुन विधानसभेत गदारोळ!

मुंबई महापालिकेच्या त्रिभाजनावरुन विधानसभेत गदारोळ!

नागपूर – मुंबई महापालिकेच्या त्रिभाजनावरुन विधानसभेत मंगळवारी चांगलाच गदारोळ झाल्याच पहायला मिळालं. आमदार नसीम खान यांनी मंगळवारी विधानसभेत मुंबई महापालिकेचे विभाजन करुन तीन स्वतंत्र महापालिका स्थापन करण्याची मागणी केली होती. नसीम खान यांच्या या मागणीवरुन विधानसभेत शिवसेना आणि भाजपच्या आमदारांनी मोठा गदारोळ केला. कुठल्याही परिस्थितीत मुंबईचे तुकडे पडू देणार नाही अशी भूमिका या आमदारांनी घेतली. त्यामुळे विधानसभेचं कामकाज काही काळ तहकूब करण्यात आलं होतं.

मालाडचा चांदीवली विधानसभा मतदारसंघ हे नसीम खान यांचे कार्यक्षेत्र आहे. सोमवारी कुर्ला पश्चिमेकडील ‘एल’ वॉर्डच्या खैरानी रोडवर असणा-या भानू फरसाणच्या दुकानाला आग लागली होती. या आगीत तब्बल बारा कामगारांना आपला जीव गमवावा लागला. या मुद्यावर चर्चा सुरु असताना नसीन खान यांनी ही मागणी केली आहे. मुंबई महापालिकेचे विभाजन करुन तीन स्वतंत्र महापालिका स्थापन करण्याची त्यांची मागणी आहे. परंतु त्यांच्या या मागणीला शिवसेना-भाजपच्या आमदारांनी जोरदार विरोध केला आहे.

 

COMMENTS