कुख्यात दहशतवाद्याला कशाला हवी आहे बीड नगरपालिकेची माहिती ?

कुख्यात दहशतवाद्याला कशाला हवी आहे बीड नगरपालिकेची माहिती ?

बीड – कुख्यात दहशतवादी अबू जुंदल उर्फ जबियोद्दीन अन्सारी याने कारागृहातून माहितीच्या अधिकाराचा वापर करीत बीड नगरपालिकेत अर्ज केला असल्याचे समोर आले आहे. 1980 पासून ते 2016 पर्यंत झालेल्या नगरपालिका निवडणुकीत कोण उमेदवार विजयी झाले, पराभूत कोण झाले, कोणाला किती मते मिळाली अशा प्रकारची माहिती मागवली होती, मात्र देशहिताच्या कारणास्तव नगरपालिका प्रशासनाने त्याला माहिती देण्यास नकार दिला आहे.

दरम्यान महापालिकेनं माहिती देण्यास नकार दिल्यानंतर अबू जुंदल याने आयुक्तांकडे अपील केले होते. परंतु त्यानंतर नागपूरचे माहिती आयुक्त दिलीप धारूरकर यांनी त्याचे अपील फेटाळले असल्याची माहिती आहे. परंतु अबू जुंदालला बीड नगरपालिकेची माहिती कशासाठी हवी आहे. हे मात्र माहित नसल्यामुळे, जुंदालला या नगरपालिकेची माहिती कशासाठी हवी आहे? असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

COMMENTS