नागपूर : आजपासून विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. या अधिवेशनात विविध मुद्द्यांवर सरकारला घेरण्याचा डाव विरोधकांनी आखला आहे. त्यामुळे हे अधिवेशन चांगलच तापणार असल्याचं दिसून येत आहे. शेतकरी कर्जमाफी, बोंडअळी, हमीभाव यांच्यासह खड्डेमुक्त महाराष्ट्र, भ्रष्टाचारासाररख्या विविध मुद्द्यांवर विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. त्यामुळे विरोधकांच्या मुद्द्यांवरुन फडणवीस सरकारची कसोटी लागणार आहे.
रविवारी मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. तसेच त्यानंतर विरोधकांनी पत्रकार परिषद घेऊन फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. नागपूरचा फरार गुंड मुन्ना यादव हा मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असून पोलिसांनी मुख्यमंत्र्यांचा मोबाईल तपासला तर नागपुरातला फरार गुंड मुन्ना यादवचा शोध लागेल, असा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी केला.ओबीसी शिष्यवृत्ती आघाडी सरकारच्या काळात 550 कोटी होती, ती या सरकारने 50 कोटींवर आणल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला. दरम्यान, ओखी वादळामुळे जेवढं नुकसान झालं नसेल तेवढं युती सरकारच्या काळात झाल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.
तर दुसरीकडे, विरोधक उद्या विधानभवनावर विरोधकांचा हल्लाबोल मोर्चा धडकणार आहे. त्यामुळे या मोर्चालाही फडणवीस सरकारला सामरे जावे लागणार आहे. मुख्यमंत्र्यांनीही त्यांच्या टिकेवर चांगलाच समाचार घेतला. आपल्याकडे हल्लाबोल करणा-यांचे डल्लाबोल पुरावे असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
COMMENTS