मंत्रालयासमोर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न !

मंत्रालयासमोर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न !

मुंबई – मंत्रालयासमोर एका महिलेनं आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अलकाबाई कारंडे असं या महिलेचं नाव असून उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील शिरगिरवाडी गावच्या त्या रहिवासी आहेत. अलकाबाईंनी सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची माहिती आहे. रॉकेल अंगावर ओतुन घेऊन त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असून यावेळी प्रसंगावधान राखत पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतलं आहे. याबबतचा अधिक तपास मरीन लाईन्स पोलिस करत आहेत.

दरम्यान आज मुंबईमध्ये मराठा समाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाची हाक दिली होती. त्यामुळे मुंबईतील कानाकोप-यात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः परिस्थितिवर लक्ष ठेऊन आहेत, यापूर्वी मंत्रालयात घड़लेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय परिसरात आज बंदोबस्त वाढवला आहे.

 

 

COMMENTS