कर्नाटकमधील भाजपचे सरकार पडले, मुख्यमंत्री येडियुरप्पांचा राजीनामा !

कर्नाटकमधील भाजपचे सरकार पडले, मुख्यमंत्री येडियुरप्पांचा राजीनामा !

बंगळुरु – कर्नाटकमधील भाजपचे सरकार पडले असून बहुमत चाचणीला सामोरे जाण्यापूर्वीच येडियुरप्पा यांनी राजीनामा दिला आहे. ‘मी आता १५० पेक्षा जास्त जागा जिंकूनच परत येईन’ असे सांगत येडियुरप्पा यांनी राजीनामा दिला. राजीनामा देण्यापूर्वी ते काहीसे भावूक झाले होते. येडियुरप्पा यांनी राजीनामा दिला आणि भाजपाच्या सर्व आमदारांनी सभात्याग केला असल्याचं पहायवास मिळालं आहे.

दरम्यान भाजपाकडे बहुमतासाठी आवश्यक संख्याबळ नसल्याने बी.एस.येडियुरप्पांनी मुख्यमंत्रीपदाचा दिला राजीनामा दिला आहे. जनतेने आम्हाला १०४ ऐवजी ११३ जागा दिल्या असत्या तर आम्ही राज्याच नंदनवन केलं असतं असं येडियुरप्पा यांनी म्हटलं आहे. तसेच माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी कर्नाटकाची सेवा करीन तसेच मी परिवर्तन यात्रा सुरु केली त्यावेळी लोकांचा मला भरपूर पाठिंबा मिळाला होता असंही येडियुरप्पा यांनी म्हटलं आहे. तसेच मी गरीब आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार बनवण्याचे माझा उद्देश होता.  मी मागची दोनवर्ष संपूर्ण राज्याचा दौरा केला आणि वेदना, दु:ख लोकांच्या चेहऱ्यावर पाहिले असून लोकांनी आम्हाला १०४ जागांचा आशिर्वाद दिला. हा जनादेश काँग्रेस आणि जेडीएसला मिळालेला नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS