बंगळुरू – भाजप नेते येडियुरप्पा यांनी आज अखेर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाने शपथविधी रोखण्यास नकार दिल्यानंतर आज त्यांचा शपथविधी पार पडला आहे. राजभवनात आज सकाळी राज्यपाल वजूभाई वाला यांनी त्यांना मुख्यमंत्रीपदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. या वेळी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, धर्मेंद्र प्रधान, जे.पी. नड्डा आणि भाजपाचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिले नाहीत.
Bengaluru: BJP's BS Yeddyurappa sworn-in as Chief Minister of Karnataka pic.twitter.com/TrkgFYNoPC
— ANI (@ANI) May 17, 2018
दरम्यान विधानसभेत बहुमत सिद्ध झाल्यानंतरच इतर मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. त्यामुळे त्यांना येत्या १५ दिवसांत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. तसेच येडियुरप्पा तिसऱ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. यापूर्वी येडियुरप्पा ऑक्टोबर 2007 मध्ये केवळ 7 दिवसांसाठी मुख्यमंत्री होते. त्यावेळी जेडीएस आणि भाजपची युती होती. मात्र ती बिनसल्याने येडियुरप्पांना अवघ्या 7 दिवसात मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार व्हावं लागलं होतं. यानंतर 2008 मध्ये येडियुरप्पांच्या नेतृत्त्वात कर्नाटकात भाजपची सत्ता आली त्यावेळी ते मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले होते.
COMMENTS