येडियुरप्पा ठरले भारताच्या इतिहासातील सर्वात कमी कालावधीचे मुख्यमंत्री !

येडियुरप्पा ठरले भारताच्या इतिहासातील सर्वात कमी कालावधीचे मुख्यमंत्री !

बंगळुरु  मोठ्या नाट्यमय घडामोडीनंतर अवघ्या 55 तासात कर्नाटकातील भाजपचं सरकार पडलं आहे. बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी राजीनामा दिला. त्यामुळे एवढ्या कमी कालावधी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणारे ते पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. ते केवळ 55 तासांसाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री राहिले असून त्यांनी 17 मे 2018 रोजी सकाळी 9 वाजता कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर 19 मे 2018 रोजी त्यांनी कर्नाटकात बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

दरम्यान यापूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री जगदंबिका पाल हे सर्वात कमी कालावधीसाठी मुख्यमंत्री ठरले होते. जगदंबिका पाल यांनी 21 फेब्रुवारी 1998 ते 23 फेब्रुवारी 1998 असे तीन दिवस यूपीचं मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं.

देशातील सर्वात कमी कालावधीचे मुख्यमंत्री

येडियुरप्पा (कर्नाटक) – 55 तास (सव्वा दोन दिवस)
जगदंबिका पाल (उत्तर प्रदेश) – तीन दिवस
सतीश प्रसाद सिंग (बिहार) – पाच दिवस
जानकी रामचंद्रन (तामिळनाड) – 24 दिवस
बी पी मंडल (बिहार) – 31 दिवस
एन भास्कर राव (आंध्र प्रदेश) –  31 दिवस
सी एच मोहम्मद कोया (केरळ) – 45 दिवस.

COMMENTS