‘त्या’ गुन्हेगारांना सोडणार नाही – योगी आदित्यनाथ

‘त्या’ गुन्हेगारांना सोडणार नाही – योगी आदित्यनाथ

लखनऊ – उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणात जे गन्हेगार असतील त्यांना सोडणार नसल्याचं वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे. या प्रकरणात आम्ही झिरो टॉलरन्सचं धोरण अवलंबलं असून, कुठल्याही गुन्हेगाराला सोडणार नसल्याचा इशारा योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे.या प्रकरणी आज भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगरला सीबीआयच्या पथकाने अटक केली आहे. परंतु या प्रकरणातील आरोपींना योगी आदित्यनाथ पाठिशी घालत असल्याचा आरोप करण्यात आला होता. परंतु कोणत्याही गुन्हेगाराला माफ करणार नसल्याचं  आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान या प्रकरणातील एसआयटीच्या अहवालानुसार, जे पोलिस कर्मचारी आणि डॉक्टर दोषी आढळले, त्यांचे निलंबन करण्यात आलं असून हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं असल्याचंही योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. तसेच या अशा प्रकरणामध्ये आमचं सरकार कोणतीही तडजोड करणार नसून गुन्हेगारांवर कठोरात कठोर कारवाई केली जाणार असल्याचं ते म्हणाले आहेत.

COMMENTS