अहमदनगर – नेवासेमध्ये नगराध्यक्ष भाजपचा, सत्ता गडाखांकडे

अहमदनगर – नेवासेमध्ये नगराध्यक्ष भाजपचा, सत्ता गडाखांकडे

अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या संगीता बर्डे विजयी झाल्या आहेत. नगराध्यक्षपद जरी भाजपकडे गेलं असलं तरी त्यांना बहुमत मिळवता आलं नाही. एकूण 17 जागांपैकी फक्त 6 जागा भाजपला मिळाले आहेत. तर माजी आमदार शंकर गडाख यांच्या क्रांतीकारी आघाडीला 17 पैकी 9 जागा मिळवत बहुमत मिळवलं आहे. काँग्रेसला 1 जागा तर अपक्षाने एका ठिकाणी विजय मिळवला आहे.

COMMENTS