पनवेल महापालिकेत भाजपची जोरदार मुसंडी

पनवेल महापालिकेत भाजपची जोरदार मुसंडी

पनवेलमध्ये यंदा पहिल्यांदाच महापालिकेची निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे.  आतापर्यत हाती आलेल्या माहितीनुसार, भाजपचे 40 उमेदवार आघाडीवर होते.

पनवेलमध्ये एकूण 78 प्रभाग आहेत. येथे 53 टक्के मतदान झाले असून 418 उमेदवार रिंगणात आहेत. पनवेल महापालिकेत शेकापचे 48, काँग्रेसचे 18 तर राष्ट्रवादीचे 12 उमेदवार रिंगणात आहेत.

पनवेलमध्ये शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादीची महाआघाडी आहे. पनवेलमध्ये भाजपचे 78 उमेदवार, शिवसेनेचे 65 आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे 13 प्रभागांवर उमेदवार दिले होते.

COMMENTS