आधी कोण ? शरद पवार की इंदिरा गांधी? अखेर तोडगा निघाला

आधी कोण ? शरद पवार की इंदिरा गांधी? अखेर तोडगा निघाला

राज्य विधिमंडळात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी की राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या पैकी कोणाचा ठराव आधी घ्यावा यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत वाद सुरू  होता. यामुळे विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या आधिच विरोध दुभांगले गेल्याचं चित्र निर्माण झालं आहे. यावर आज अखेर तोडगा निघाला.

वेगवेगळ्या मान्यवरांचे वेगवेगळे प्रस्ताव घेण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला. यात शरद पवार आणि गणपतराव देशमुख यांचे एकत्रित कार्यकाळ गौरव प्रस्ताव असेल तर इंदिरा गांधी कार्यकाळ गौरव प्रस्ताव वेगळा घेण्यात येणार असल्याचे बैठकीत ठरले आहे. 5 आॅगस्टला शरद पवार यांचा कार्यकाळ गौरव प्रस्ताव तर 9 आॅगस्ट क्रांती दिना दिवशी इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळ प्रस्ताव सभागृह समोर मांडला जाणार आहे.

दरम्यान, पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या अभिनंदनाचा ठराव आधी करायचा की माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचा, या मुद्द्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये मानापमान नाट्य रंगले होते. त्यामुळे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांच्या संयुक्त पत्रकार परिषदेची ‘परंपरा’ही मोडीत काढत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्वतंत्रपणे भूमिका मांडली. काँग्रेस व राष्ट्रवादीने वेगवेगळ्या पत्रकार परिषदा घेतल्या असल्या तरी चहापानावर बहिष्कार घालत असल्याची भूमिका समान असल्याचे दाखवून दिले.

 

 

 

COMMENTS