मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी वाढली, भाजपच्या आणखी एका मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप !

मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी वाढली, भाजपच्या आणखी एका मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप !

जालना  आगामी निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची डोकेदुखी आणखी वाढली असल्याचं दिसत आहे. कारणे भाजपच्या आणखी एका मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला आहे. राज्याचे पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्यावर हा आरोप करण्यात आला आहे. लोणीकर यांनी साखर कारखान्याच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून पैसे गोळा करुन याच पैशांतून खऱेदी केलेली जमीनच हडप केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

काय आहे आरोप ?

बबनराव लोणीकर यांनी चतुर्वेदेश्वर साखर कारखाना सुरू करण्यासाठी 2000 साली समभागाद्वारे शेतकऱ्यांकडून पैसा जमा केला. कारखान्याच्या नावे मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी केली. मात्र हा कारखाना सुरू झालाच नाही. याऊलट ही 50 एकर जमीन स्वत:च्या आणि कुटुंबियांच्या नावे केल्याचा आरोप करणारी याचिका औरंगाबाद खंडपीठात बळीराम कडपे यांनी दाखल केली आली आहे.

दरम्यान यापूर्वी भाजपच्या एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे, प्रकाश मेहता या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. त्यानंतर आता लोणीकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आल्यामुळे मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी वाढली असल्याचं दिसत आहे.

 

COMMENTS