“नारायण राणेंचा भाजपला गर्भित इशारा, माझ्या सहनशीलतेचा अंत पाहू नका!”

“नारायण राणेंचा भाजपला गर्भित इशारा, माझ्या सहनशीलतेचा अंत पाहू नका!”

मुंबई :  महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांनी भाजप सरकारला गर्भित इशारा दिला असून माझ्या सहनशीलतेचा अंत पाहू नका असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. मंत्रिपदाचं आश्वासन देऊन अनेक दिवस उलटले असले तरी नारायण राणे हे अजूनही मंत्रिपदाच्या प्रतिक्षेत आहेत. मला जास्त दिवस वाट पहायची सवय नाही त्यामुळे माझ्या सहनशीलतेचा अंत पाहू नका असा इशाराच राणे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन दिला आहे. तसेच याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार असल्याचंही राणे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलत असताना त्यांनी कोकणात राजापूर येथील नाणार प्रकल्पाला तीव्र विरोध केला आहे. पैशांसाठी कोकण भस्मसात करण्याचा शिवसेनेचा डाव असल्याचा आरोप राणे यांनी यावेळी केला आहे. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आणि केंद्रीय उद्योगमंत्री अनंत गिते यांनीच नाणारचा प्रकल्प कोकणात आणल्याचा आरोप राणे यांनी केला आहे. कोणत्याही परिस्थितीत नाणार प्रकल्प होऊ देणार नाही, असा निर्धार राणेंनी व्यक्त केला आहे.

 

COMMENTS