“उद्योगमंत्री सुभाष देसाईंच्या चौकशीचा अहवाल लवकरच सादर होणार !’

“उद्योगमंत्री सुभाष देसाईंच्या चौकशीचा अहवाल लवकरच सादर होणार !’

मुंबई –  उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या चौकशीचा अहवाल 15 ते 20 दिवसात शासनाकडे सादर करणार असल्याची माहिती चौकशी समितीचे प्रमुख के. पी. बक्षी यांनी दिली आहे. एमआयडीसीची 30 हजार एकर जमीन वगळल्याचा आरोप देसाईंवर करण्यात आला आहे. विरोधकांनी केलेल्या आरोपानंतर त्यांच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली होती.

दरम्यान मागील वर्षीच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी सुभाष देसाई यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. सुभाष देसाईंनी एमआयडीसीतील 30 हजार एकर जमीन वगळली असून सरकार त्यांना पाठिशी घालत असल्याचा आरोप करण्यात आला होता. विरोधकांनी केलेल्या या आरोपानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देसाई यांची चौकशी केली जाणार असल्याची घोषणा सभागृहात केली होती. त्यानंतर सध्या चौकशी सुरु असून या चौकशीचा अहवाल 15 ते 20 दिवसात सादर करणार असल्याचं समितीचे अध्यक्ष के. पी. बक्षी यांनी दिले आहेत.

COMMENTS