युती भाजपची मजबुरी नाही, युती तर्कावर आणि आकड्यांवर होते, भावनेवर युती होत नाही – सुधीर मुनगंटीवार

युती भाजपची मजबुरी नाही, युती तर्कावर आणि आकड्यांवर होते, भावनेवर युती होत नाही – सुधीर मुनगंटीवार

मुंबई – नागपूर अधिवेशनबाबत मत जाणून घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांची भेट होणार होतो. मात्र झाली नाही. आम्हाला युती हवी आहे, मतांचे विभाजन होऊ नये, पुन्हा काँग्रेस आघाडी सत्तेत येऊ नये असं वाटत असेल तर युती व्हायला पाहिजे. म्हणून आम्ही चर्चेला जात आहोत असं वक्तव्य भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आह. तसेच जर का युती सेनेला नको असेल तर जबरदस्ती नाही. जब तक सूरज चांद रहेगा तब तक युती नही होगी असं काही असेल तर हरकत नाही असही ते म्हणाले आहेत.

दरम्यान उद्धव ठाकरे यांनी मुनगंटीवार यांना भेट नाकारल्यामुळे त्यांनी हे वक्तव्य केलं असून शिवसेनेला युती करायची नसेल तर भाजपची स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच 288 जागा लढवू आणि सत्ताही मिळवूही असा विश्वासही त्यांनी वर्तवला आहे. तसेच नाणार प्रकल्प गुजरातला हवा आहे, आपण विरोध केला तर तो तिकडे जाईल. एक लाख रोजगार यामुळे मिळणार आहेत. त्यामुळे हा प्रकल्प काकणात झाला पाहिजे अशी आमची इच्छा असल्याचही मुंगंटीवार यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS