अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार राजकारणात सक्रीय होणार ?

अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार राजकारणात सक्रीय होणार ?

बारामती  माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार राजकारणात सक्रीय होणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत झालेल्या कार्यक्रमात पार्थ पवार यांनी उपस्थिती लावल्याने ही चर्चा रंगली आहे. बारामतीमधील विविध कार्यक्रमात आजोबा शरद पवार यांच्यासोबत पार्थ पवार यांनी हजेरी लावत गाडीत एकत्रित प्रवास केला आहे. त्यामुळे आता पार्थ हे लवकरच राजकारणात सक्रीय होतील अशी चर्चा सध्या रंगली आहे.

दरम्यान देशाच्या राजकारणात सक्रीय असलेले आणि ज्यांच्या राजकारणातील गणितांचा अजून कोणालाही उलगडा न झालेल्या मुरब्बी राजकारण्याकडून म्हणजेच शरद पवारांकडून पार्थ धडे गिरवत असल्याचं दिसत आहेत.तसेच मागील जिल्हापरिषद निवडणुकीपासून अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार राजकारणात सक्रीय झाले आहेत. रोहित पवार यांच्या जोडीला पार्थ पवार यांना राजकारणात आणून राष्ट्रवादी राज्यातील तरुणांचे मोठी संघटना निर्माण करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

COMMENTS