मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला निलंग्याजवळ आज (दि.25) अपघात झाला आहे. उड्डाण केल्यानंतर काही क्षणातच हे हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातात फडणवीस हे थोडक्यात बचावले आहे.
फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरने दुपारी 12 वाजता उड्डाण केलं. पण वाऱ्याचा बदलता दाब लक्षात आल्याने वैमानिकाने लॅण्डिंग करण्याचं ठरवलं. पण यादरम्यान, हेलिकॉप्टरचा पंखा एका वीजेच्या खांबांच्या तारांमध्ये अडकलं. यामुळे हेलिकॉप्टर कोसळून अपघात झाला. सुदैवाने या वीजेच्या तारांमध्ये वीजपुरवठा खंडीत झाल्याने मोठी दुर्घटना टळली. अन्याता मोठा अनर्थ घडला असता.
हेलिकॉप्टरमध्ये मुख्यमंत्र्यांसह सहा जण होते. त्यात दोन क्रू मेंबर होते. अपघातग्रस्त हेलिकॉप्टर सहा वर्षे जुने असल्याची माहिती आहे. अलिकडेच मुख्यमंत्र्यांच्या गडचिरोली दौऱ्यातही हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला होता. एक इंजिन बिघडल्याचे लक्षात येताच मुख्यमंत्री रस्ते मार्गाने नागपूरला परतले होते. यावरुन हेलिकॉप्टरच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
दरम्यान, लातूरमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी श्रमदान करुन तरुणांसोबत संवाद साधला. शिवाय जलयुक्त आणि शेततळ्यांची पाहणीही केली. लातूर दौऱ्यावर असेलेल्या मुख्यमंत्र्यांनी हलगरा हे गाव दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे.
COMMENTS