बारामती – कोणाचीची भाडभीड न ठेवता रोखठोक आणि काहीसे फटकळ असलेले राज्याचे माजी उपमुख्यमंत्री फारसे कधी भावनिक झालेले पहायला मिळत नाहीत. आज मात्र बारातमीमध्ये भाषण करत असतान अजित दादांना गहिवरुन आलं. विद्याप्रतिष्ठानमध्ये सायकल वाटपाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी जमलेल्या बारामतीकरांना कोजगिरी पौर्णेमेच्या शुभेच्छा दिल्या.
कोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा किंवा शारदीय पौर्णिमा असं म्हटलं जातं.. अशा दोन्ही व्यक्ती कुटुंबात असल्यानं आम्ही पवार कुटुंबीय याबाबतीत सुदैवी असल्याचं सांगताना अजित पवार यांना अक्षरशः गहिवरून आलं. काही क्षण ते शांत राहिले पण त्यांचे डोळे भरुन आले. त्यांचा आवाज कापरा झाला. ते काही क्षण सभागृह देखील स्तब्ध झाले होते.
शरद पवार यांच्याविषयी भावना व्यक्त करताना अजित पवार कमालीचे हळवे होतात असा अनुभव नेहमीच येतो. आजही व्यासपीठावर स्वताः शरद पवार उपस्थित असताना त्यांच्याविषयी भावना व्यक्त करताना अजित पवार यांचे डोळे पाणावले.
“खरं तरं भाषण करताना माझं असं कधी होत नाही, आज पहिल्यांदाच असे घडले,“ असे बोलतानाही त्यांचा आवाज कातर झाला होता. काही क्षण शांत राहत त्यांनी भावनांवर नियंत्रण मिळविले. आणि पुढील भाषण सुरु केले. मात्र या वेळी व्यासपीठावर उपस्थित सुप्रिया सुळे व खुद्द शरद पवार यांनाही गहिवरुन आले होते.
सरस्वती आणि लक्ष्मी दोन्ही आणण्याची धमक मुलींमध्ये असते, त्या मुळे त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचीच भूमिका नेहमी आम्ही घेऊ,“ असे अजित पवार यांनी नंतर भाषणात सांगितले.
COMMENTS