अमरावती – अमरावतीमध्ये राज्याचे आरोग्य मंत्री आणि शिवसेना नेते दीपक सावंत यांच्या देखतच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आपच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली.
राज्याचे आरोग्य मंत्री दीपक सावंत काल आणि आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. आज दीपक सावंत हे अमरावतीमध्ये एका रुग्णालयाला भेट देण्यासाठी आले असता तिथे आलेल्या आपच्या कार्यकर्त्यांनी सावंत यांना निवेदन दिले. मंत्र्यांना विविध समस्ये बाबत निवेदन दिल्या नंतर आपच्या कार्यकर्त्यानी मंत्र्या विरोधात घोषणाबाजी सुरु केली. यावेळी पोलिसांनी आपच्या सर्वच कार्यकर्त्याना बाहेर काढले. तरी सुद्धा ते घोषणा देत होते. त्यामुळे खवळलेल्या शिवसैनिकांनी घोषणाबाजी करणाऱ्या आपच्या कार्यकर्त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने- सामने आल्याने त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. मात्र यावेळी आपच्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी त्यांना बेदम मारहाण केली. यानंतर दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमधील हा राडा रस्त्यावरच सुरु झाला.
COMMENTS