अमित शहा, स्मृती इराणी यांनी घेतली राज्यसभा सदस्यत्वाची शपथ

अमित शहा, स्मृती इराणी यांनी घेतली राज्यसभा सदस्यत्वाची शपथ

नवी दिल्ली – भाजप अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आज शुक्रवारी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. शहा आणि इराणी यांना राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी शपथ दिली. विशेष म्हणजे इराणी यांनी संस्कृतमध्ये शपथ घेतली.

राज्यसभेवर शहा पहिल्यांदाच निवडून गेले आहेत. तर इराणी यांचा हा दुसरा कार्यकाळ आहे. नुकतीच गुजरातमधील राज्यसभेच्या तीन जागांसाठी निवडणूक झाली. भाजपचे उमेदवार शहा आणि इराणी यांनी त्यात विजय मिळवला. तर तिसऱ्या जागेवर काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी विजय मिळवला. निवडणूक आयोगाने काँग्रेसच्या दोन आमदारांची मते बाद ठरवल्यानंतर पटेल यांना विजयी घोषित केले.

COMMENTS