अमित शहा यांनी घेतला खासदारांचा ‘क्लास’

अमित शहा यांनी घेतला खासदारांचा ‘क्लास’

नवी दिल्ली –  भाजपच्या खासदारांच्या आज (मंगळवार) सकाळी झालेल्या साप्ताहिक बैठकीमध्ये अमित शहा यांनी संसदेत अनुपस्थित राहणाऱ्या खासदारांची चांगलीच कानउघडणी केली.  काल राज्यसभेत अनुपस्थित असलेल्या सर्व खासदारांशी अमित शहा व्यक्तिश: ‘चर्चा’ही करणार आहेत. ‘तुम्हाला जनतेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडून दिले आहे. मग सत्र सुरू असताना गैरहजर राहण्यातून चुकीचा संदेश जातो’, असे शहा यांनी या खासदारांना सुनावले. 

राष्ट्रीय ओबीसी आयोगाच्या स्थापनेसाठी केंद्र सरकारने आणलेल्या घटनादुरुस्ती विधेयकाला काल (सोमवार) भाजपच्याच खासदारांच्या अनुपस्थितीचा फटका बसला. यामुळे भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी कडक भूमिका घेतली आहे.

खासदार अनुपस्थित राहिल्याचा फटका ओबीसी विधेयकास बसला. नियमानुसार दोन तृतीयांश मते न मिळाल्याने या विधेयकातील तिसऱ्या क्रमांकाची दुरुस्ती फेटाळली गेली. आता हे विधेयक लोकसभेतून पुन्हा मंजूर करून मग राज्यसभेसमोर आणावे लागणार आहे. अर्थात, या महत्त्वाच्या विधेयकावर चर्चा करण्यासाठी सर्वच पक्षांची उदासीनता दाखविली. अंतिम मंजुरीच्या वेळीही 245 पैकी केवळ 126 सदस्यच सभागृहात उपस्थित होते.

 

COMMENTS