यापुढे पीकविम्याला मुदतवाढ मिळणार नाही – मुख्यमंत्री

यापुढे पीकविम्याला मुदतवाढ मिळणार नाही – मुख्यमंत्री

मुंबई – पंतप्रधान पीक विमा योजनेचे अर्ज स्वीकारण्यासाठी 5 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला तरी यापुढे पुन्हा मुदतवाढ देणे शक्य नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत बोलताना स्पष्ट केले.

पीक विम्यासाठी पुन्हा-पुन्हा मुदतवाढ देणे शक्य नाही. यामध्ये री-इन्शुरन्ससारखे भाग येतात. या कारणाने पुन्हा पुन्हा मुदतवाढ देण्याच्या प्रक्रियेत काही तांत्रिक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे आता पुन्हा मुदतवाढ देणे शक्य नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

पीकविमा अर्जासाठी 31 जुलैची डेडलाईन देण्यात आली होती. मात्र अर्ज भरण्यासाठी ठिकठिकाणी प्रचंड झुंबड उडाली होती. काही ठिकाणी पोलिसांना लाठीमारही केला होता. त्यात एकाचा ह्रदयविकाराने मृत्यू झाला होता. पीक विमा अर्ज ऑनलाईनऐवजी ऑफलाईन करावेत अशी मागणी होतीच, पण मुदतवाढही द्यावी अशी मागणीही विरोधकांकडून विधानसभेत करण्यात आली होती. अखेर मुदतवाढ ही 5 ऑगस्टपर्यंतच राहील असे जाहीर करण्यात आले.

 

COMMENTS