अहमदनगर – जिल्ह्यातील शेवगावमध्ये माजी सैनिकासह कुटुंबातील चार जणांची निर्घृण हत्या करण्यात आली. माजी सैनिकासह त्यांची पत्नी, मुलगा आणि मुली यांना मारेकऱ्यांनी ठार केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मृतामध्ये आप्पासाहेब गोविंद हरवणे ( वय 57), त्यांची पत्नी सुनंदा हरवणे (वय45), मुलगी स्नेहल हरवळे (वय 18) व मुलगा करंद आप्पासाहेब हरवणे (वय 15) यांचा समावेश आहे. या सर्वांची धारधार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे.
शेवगाव मधील इरिगेशन कॉलनीत ही घटना घडली आहे. मृत आप्पासाहेब हरवणे हे निवृत्त सैनिक आहेत. ते भूमी अभिलेख विभागाच्या सेवेत होते. रविवारी सकाळी दूध घेण्यासाठी घरातल्या कुणीच दरवाजा उघडला नाही. त्यामुळे शेजाऱ्यांनी खिडकीतून डोकावून बघितलं असता हरवणे कुटुंबांची हत्या झाल्याचं उघड झालं. हरवणे कुटुंबाच्या हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
COMMENTS