“आजही मला वाटतं मी रोज बाळासाहेबांशी बोलतो, ऐकतो आणि काम करतो”

“आजही मला वाटतं मी रोज बाळासाहेबांशी बोलतो, ऐकतो आणि काम करतो”

मुंबई – शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीच्या दुस-या खंडातील एकवचनी या पुस्तकाचं प्रकाशन काल झालं. या कार्यक्रमाला केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्तित होते. यावेळी सर्वच नेत्यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.

आजही मला वाटते मी रोज बाळासाहेबांशी बोलतो, ऐकतो आणि काम करतो या शब्दात मुलाखतकार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याविषच्या भावना बोलून दाखवल्या. सामाना वृत्तपत्र हे प्रादेशिक आहे मात्र बाळासाहेबांच्या भूमिकेमुळे ते राष्ट्रीय बनलं. बाळासाहेबांची विधानं म्हणज्ये बंदुकीच्या गोळ्या होत्या या शब्दात त्यांनी बाळासाहेबांविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. बाळासाहेबांच्या मुलाखती म्हणजे सांस्कृतीक, सामाजिक आणि राजकीय संदर्भ ग्रंथचं आहेत असंही राऊत म्हणाले.

बाळासाहेब नेते होतेच पण त्यापेक्षाही एक चांगला माणूस होते. त्यांची बोलण्याची ओघवती आणि सहज शैली होती. त्यांच्या बोलण्याने अनेकांची बोलती बंद व्हायची. त्यांचा शब्द म्हणज्ये सौ सोनारी की एक लोहार की. त्यामुळेच त्यांच्या मुलाखती घेणं म्हणजे मेजवानी वाटायचं असंही राऊत यांनी सांगितलं.

COMMENTS