मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी मतदान सुरू

मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी मतदान सुरू

मीरा भाईंदर – मीरा भाईंदर महापालिकेसाठी आज मतदान सुरू झालं आहे.  मात्र सकाळीच पावसानं हजेरी लावल्यानं मतदानावर परिणाम होत आहे. गेल्यावेळी फक्त 46.99 टक्के मतदान झालं होतं. राज्यात सत्तेत एकत्र असलेले भाजप आणि शिवसेना तसंच विरोधातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसही स्वबळावर निवडणुक लढवत आहेत. भाजप शिवसेना आणि काँग्रेस यांच्यातच मुख्य लढत होणार आहे. मनसे इतर छोटे मोठे पक्ष आणि काही अपक्षही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. उद्या म्हणज्येच 21 तारखेला मतमोजणी होणार आहे. शिवेसना आणि भाजपच्या उमेदवाराच्या जातीच्या प्रमाणपत्राच्या गोंधळामुळे एका मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवा बिनविरोध निवडूण आला आहे.

एकूण जागा – 94

विविध पक्षांचे किती उमेदवार रिंगणात आहेत ?

भाजप आणि आरपीआय ( आठवले ) – 89

शिवसेना   – 93

काँग्रेस – 74

राष्ट्रवादी – 67

अपक्ष – 104

गेल्या निवडणुकीतील पक्षीय बलाबल

भाजप – 29

शिवसेना – 14

राष्ट्रवादी – 27

काँगेस – 19

COMMENTS