आणखी एक मराठी माणूस पंतप्रधानपदाच्या शर्यतीत !

आणखी एक मराठी माणूस पंतप्रधानपदाच्या शर्यतीत !

होय हे खरंय !  मराठी मातीतील, कोकणाच्या भूमितील आणि मालवणी मुलखातील लिओ अशोक वराडकर हे सध्या आर्यलंडच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीमध्ये आहेत. पुढच्या महिन्यात तिथे पंतप्रधान पदाची निवडणूक आहे. वराडकर हे विजयाचे प्रबळ दावेदार समजले जातात. लिओ वराडकर हे अशोक वराडकर यांचे पुत्र आहेत. वराडकर यांचं अख्यं कुटंबच डॉक्टर आहे. काही वर्षांपूर्वी अशोक वराडकर आर्यलंडला गेले होते. तिथेच ते एका आयरीश मुलीच्या प्रेमात पडले आणि तिथेच ते स्थायीक झाले. त्यांचा मुलगा लिओ अशोक वराडकर हे सध्या आर्यलंडमध्ये देशाचे कॅबिनेटमंत्री आहेत. त्यांना त्यांच्या पक्षाने यावेळी पंतप्रधानपदाची उमेदवारी दिली आहे. तसंच ते विजयाचे प्रबळ दावेदारही समजले जातात. त्यामुळे मराठी आणि त्यातही कोकणी माणूस पुढच्या महिन्यात आर्यलंडचा पंप्रधान होणार हे जवळपास नक्की आहे.

वराडकर कुटंब हे मुळचं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील वराड गावचं आहे. आजही गावात त्यांचं घर आहे. तसंच बागायती शेती आहे. अशोक वराडकर आणि त्यांच्या आयरिश पत्नी हे नेहमी वराडला भेट देतात. अशोक वराडकर यांची जमीन सध्या त्यांचे भाऊ करतात. आपल्या गावचा एक व्यक्ती आर्यलंडचा पंतप्रधान होणार म्हणून गावात आनंदाचे वातावरण आहे. पंतप्रधान झाल्यावर लिओ यांना घेऊन वराडला नक्की येईल असं आश्वासन अशोक वराडकर यांनी गावक-यांना दिलं आहे.

COMMENTS